नांदेड जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीतील दोन कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय परस्परपूरक राजकीय भूमिका घेतल्यास त्यांचा राजकीय प्रवास सोयीस्कर झाला असता.

( सिद्धार्थ एल एडके- पुणे/ २६.०६.२०२० )
नांदेड जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीतील दोन वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय परस्परपूरक राजकीय भूमिका घेतल्यास त्यांचा राजकीय प्रवास अधिक सोयीस्कर झाला असता.
अरुनकुमार कोळगावकर आणि राहुल दादा प्रधान.
दोघेही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चांगला प्रचार केले.चांगला जनप्रतिसाद मिळविला.
अरुनकुमार सूर्यवंशी कोळगावकर हे राहुलदादा प्रधान यांच्या युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते तर राहुल दादा हे स्वतः युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष.
कोळगावकरांना युवा पँथरचे कार्यकर्ते चांगले ओळखीचे होते तर राहुल प्रधान यांना VBA चे कार्यकर्ते ओळखून आहेत. त्यांच्यात एकत्र काम करण्याची चांगली टायमिंग जमून आली होती.
पण अरुनकुमार कोळगावकारांनी युवा पँथर सोडून स्वतंत्र प्रजासेना ही संघटना स्थापन केले तर राहुलदादा यांनी भीम आर्मीचे #रावण यांच्या नवीन स्थापना केलेल्या पक्षात जाण्याचे घोषित केले आहे.
आता दोघांनाही नवीन कार्यकर्ते नवीन संघटन आणि नवीन वाटचाल करावी लागणार आहे.जर सर्व निर्माण झालेल्या परिस्थितीत स्वतःला पुढे नेण्यास अधिक सोयीस्कर झाले असते.
पण विधानसभेला नांदेड उत्तर मधून राहुलदादा चे निवडणुकीतील उमेदवारी फिक्स दिसत असतांना मध्येच कोणीतरी चावरे उमेदवार घोषित केला गेला त्यामुळे साहजिक राहुलदादाचे नाराज होणे आले, त्यातून ते वंचितपासून दूर गेले असतील असे समजूया, पण अरुणकुमार कोळगावकर यांचे पँथर पासून दूर जाण्याचे कारण अद्याप पर्यंत समजू शकलो नाही.
नवीन वाटचालीस दोघांनाही शुभेच्छा ..

                                        ( सिद्धार्थ एल.एडके)
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या