तालुक्यातील बरबडा या ठिकाणी जवाहरलाल नेहरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही नामांकीत शिक्षणसंस्था असून या शिक्षण संस्थेत पाटोदा, इज्जतगाव, मनूर, आंतरगाव या गावातील जवळपास 200 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बरबडा याठिकाणी येतात बससेवा नसल्यामुळे या मुलांना शाळेत पायी यावे लागत आहे.बरबडा या गावांपासून काही गावे 4 ते 5 किमी अंतरावर आहेत. त्यामुळे शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
शाळा सुरू होण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळेवर याठिकाणी बस सेवा चालू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक पन्हाळकर व वाहतूक अधिकारी श्री.वाळवे यांच्याकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे बरबड्या चे सरपंच माधवराव कोलगणे बरबडा ग्रामपंचायत चे माजी सदस्य माधव माचनवाड, विलास ढगे योगेश ढगे आदी जण उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy