नांदेड महानगरपालिका गुंठेवारी प्रकरनातील आरोपीस उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
नांदेड येथील महानगर पालिका हद्दीतील महाराष्ट्र गुंठेवारी विकास(नियमाधिन करणे व श्रेणी आढावा नियंत्रण)अधिनियम 2020 अंतर्गत गुंठेवारी प्रमाणपत्रावर खोट्या स्वाक्षऱ्या करणे व खोट्या प्रमाणपत्रावर जावक क्रमांक नोंदविल्या व महानगर पालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी दि. 8 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा नोंविण्यात आला होता, व त्यात मुख्य आरोपी म्हणून कनिस फातेमा भ्र.मोहम्मद मसूद सौदागर व इतर चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
प्रकरणाची संपूर्ण माहिती अशी की, नांदेड महानगर पालिका हद्दतील काही भागात गुंठेवारी प्रकरणात खोट्या स्वाक्षऱ्या करून व खोट्या प्रमाणपत्रावर जावक क्रमांक लिहून शासनाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिनांक 8/12/2022 रोजी दवणे विजय कुमार शेषेराव यांनी वजिराबाद पोलिस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केले होते.
दिनांक 15/12/2022 रोजी वजिराबाद पोलिस स्टेशन नांदेड येथे कलम भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 420,465,467, 468, 471 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील गुण्यातील आरोपी कणीस फातेमा भ्र. मोहम्मद मसूद सौदागर यांनी दिनांक 19/12/2022 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने सदरील अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्या नाराजीने आरोपीच्या नातेवाईकाने अटक पूर्व जामीनासाठी मा.उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे ॲड. सुरेश पिडगेवार तमलुकर व ए. बी. शारुख यांच्या मार्फत अटक पूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीस मा.उच्च न्यायालयासमोर सुनावणीस साठी आले असता मा.उच्च न्यायालयाने दिनांक 05 एप्रिल 2023 रोजी अटकेस तात्पुरती स्थगिती दिली होती तदनंतर सदरील प्रकरण सुनावणीसाठी मा. न्यायमूर्ती आर. एम. जोशी साहेब यांच्या न्यायालयासमोर आले असता मा.उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणने ऐकुन घेऊन जमीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता व दिनांक. 11 जुलै 2023 रोजी मा.न्यायालयाने अपला निकाल जाहीर करत आरोपींचा जमीन अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात केल्याचे जाहीर केले या वेळी आरोपीची बाजू ॲड.सुरेश पिडगेवार तमलूरकर यांनी मांडली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या