नांदेडमध्ये काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर निवडीचे जल्लोषात स्वागत !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाकडून 21 मार्च रोजी सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, यात महाराष्ट्रातील ७ उमेदवारांचा समावेश आहे. त्यात नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नांदेड सह नायगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याकडून जल्लोषात आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला जात आहे.
 नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून कोणता उमेदवार जाहीर होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून असताना आज काँग्रेस पक्षाकडून ७ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे नाव जाहीर होताच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याकडून नायगाव येथील हेडगेवार चौकात फटाक्यांची अतिशबाजी करून एकमेकांना पेढा भरून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी नायगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष प्रतिनिधि संजय पाटील चव्हाण, नगरसेवक पांडूरंग चव्हाण, श्रीकांत चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, विठ्ठल बेळगे,साईनाथ चन्नावार, तमलुरे,देवीदास तमनबोईनवाड सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या