नांदेड शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय प्रेरक संघटनेची बैठकीचे संपन्न !

[ प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय साक्षरता अभियान योजनेची अंमलबजावणी माहे जानेवारी २०१२ पासून सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक गाव वाडी तांड्यावरील शाळेवर दरमहा दोन हजार रुपये मासिक मानधनवर काम करणारे सुशिक्षित बेरोजगार पदवीधर यांना शिकविण्याचे काम मिळाले होते. ते काम पवित्र अशा शिक्षणाचे असून आपल्या हातून ज्ञानदानाचे काम होत आहे.

या उदात हेतूने अतिशय तळमळीने, कष्टाने मेहनतीने शिकविण्याचे काम सुरू केले होते. परंतु राज्य व केंद्र शासनाने हे मानधन वेळेवर न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कष्टाचा व घामाचा दाम वेळेवर मिळाला तरच पुढील काम करण्यास ऊर्जा मिळते या अशाने, त्यांनी नित्यनेमाने शिकविण्याचे काम करीत आहेत.

परंतु शासनाने या प्रेरक प्रेरिकांना अद्याप पर्यंत मानधन न दिल्याने त्यांचे अख्खे कुटुंब उघड्यावर आले आहे. यामुळे त्यांना नाहक त्रास होत आहे. या शासनाच्या धोरणाविषयी व प्रेरक प्रेरकांच्या काही मागण्या घेऊन शिक्षण विभाग मंत्रालय मुंबईकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

मागण्या मंजूर करण्यासाठी आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम तयार करून राज्यस्तरीय प्रेरक प्रेरकांच्या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजन नांदेड येथे दिनांक १८/०९/२०२२ रोजी शासकीय विश्रामगृहमध्ये दुपारी 12 वाजता या राज्यस्तरीय बैठकीला जिल्हातून प्रत्येक तालुक्यातून शेकडो प्रेरक, प्रेरिका नांदेड येथे झालेल्या बैठकीत उपस्थित कार्यक्रमात समस्यासाठी तमाम प्रेरक प्रेरिकांनी या बैठकीला उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रेरक प्रेरिका संघर्ष संघटनाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माणिक कांबळे बारडकर, प्रभागकर व्यव्हारे, जिल्हा महासचिव सदाशिव पतंगे पाटील सचिव मोहन जाधव, महिला जि. अध्यक्ष पार्वती केंद्रें, ता अध्यक्ष मुदखेड गणेश जाधव, गंगाधर वासनिकर, होनशेट्टे, फेरोज पटेल, हदगाव संतोष दोडके, नायगांव तालुका सचिव दिपक गजभारे घुंगराळेकर, माधव वाघमारे माने बाबाराव सिद्धार्थ हणमंते मारोती सोनकांबळे गौतम आढाव सुरज घोंनशेटवाड आशाताई जाधव सत्वशिला खंडगावकर स्नेहलता गजभारे गौतम भालेराव, देविदास कोंडलाडे संतोष सुर्यवंशी आदी उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या