तळागाळातील महिलांना स्वावलंबी करण्याचे काम करावे – नंदकुमार गादेवार

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
आर्य वैश्य समाजातील गोरगरीब तळागाळातील महिलांना छोट्या व्यवसायात आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर स्वावलंबी करून रोजगार मिळवून देण्याचे काम करावे असे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी केले आहे.

          नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात महाराष्ट्र अधिवेशन महासभेचे नांदेड जिल्हा ग्रामीण कार्यकारणी मंडळ बैठकीचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या उपस्थिती घेण्यात आली. यावेळी गादेवार पुढे म्हणाले की महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे ग्रामीण कार्यकारणीची निवड झाल्यानंतर कौतुकास्पद, चांगल्या प्रकारे उपक्रम राबवले यामध्ये इस्लापूर शिवनी प्रकरण उमरी तालुक्यातील मानूर प्रकरण हादगाव तालुक्यातील दरोडा प्रकरण किनवट तालुक्यातील श्रीकांत कंचरलवार मृत्यू प्रकरण तसेच वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण रक्तदान शिबिर मोठ्या चांगल्या प्रकारे निर्णय घेतले यापुढे तिरुपती येथील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाच्या भूमिपूजन व महासभेचे महत्त्वाचे बैठक दिनांक 15 , 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे त्या बैठकीत जास्तीत जास्त संख्येने सभासदाने उपस्थित राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात महासभेचे सेक्रेटरी गोविंदराव बिडवई, अनिल मनाठकर, नंदकुमार मडगूलवार, प्रदीपजी कोकडवार, सदानंद मेडेवार, सुरेश पंदीलवार, सूर्यकांत पलीकोंडवार, प्रभाकर पत्तेवार, गिरीष कोत्तावार, सुनील लोकमानवार, डॉ संजय पलीकोडंवार, प्रवीण जन्नावार, दिलीप तेललवार, गजानन चौधरी, साईनाथ कामिनवार, प्रल्हाद काशेटवार, धनंजय कवटीकवार, चंद्रकांत गुंडाळे, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार, विजय पांपटवार, प्रमोद पाटील, अनिल शीरमवार,श्याम मारुडवार, गुंडाळे, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपस्थिती होती या सभेचे प्रास्ताविक प्रदीप कोकडवार यांनी तर आभार साईनाथ कमिनवार यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या