नरसी येथे अमित शाह यांची सभेची जय्यत तयारी !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष तथा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची ११ एप्रिल दुपारी ४ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 
नांदेड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी येथे विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता नरसी येथील भव्य मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी नरसी येथे जाऊन जागेची पाहणी केली आहे.
नरसी येथील सभेला भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नांदेड लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नरसी येथील जागेची पाहणी केली आहे. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नरसी येथे भेट देऊन जागेची पाहणी केली. आले असता मैदानाची पाहणी केली.
यावेळी आमदार राजेश पवार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश कुंटूरकर, शिवराज पाटील होटाळकर , श्रावण पाटील भिलवंडे हे उपस्थित होते. तरी नरसी येथील सभेला जास्तीत जास्त मतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या