तिरुपती तिरुमला प्रतिरूप समजले जाणाऱ्या नरसी भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडवा महोत्सवानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
तसेच खासदार रवींद्र चव्हाण यांनी गुढीपाडवा निमित्ताने जनतेला व भावी शुभेच्छा दिल्या तिरुपती तिरुमला प्रतिरूप भविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणारा नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडवा महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन आले होते पहाटे 6 ते 8 भगवान बालाजी मंदिरात मूर्तीला वेद मंत्रोच्चारात 108 कलश महा अभिषेक व . व्यंकटेश स्तोत्राचे पारायण भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण ,हनमंतराव पाटील चव्हाण संजय आप्पा बेळगे लक्ष्मणराव ठक्करवाड, वसंतराव मेडेवार, बाबुराव शक्करवार, सदानंद मेडेवार, नंदकुमार मडगुलवार, राम सावकार पत्तेवार, विजयकुमार कुंचनवार,यांच्यासह सर्व मंदिर विश्वस्त मंडळी उपस्थित होते. गुढीपाडवा महोत्सवानिमित्ताने मंदिर परिसरात गुढी उभारण्यात आले होते तसेच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध फुलाने मंदिर सजवण्यात आले होते नऊ वाजता महाआरती झाल्यानंतर महाआरती.
सकाळी 09 ते 11 रथोस्तव, ढोल-ताशाच्या गजरात अतिशबाजीत मंत्रमुग्ध वातावरणात टाळ मृदंगाच्या चालीवर महिला पुरुषानी बाल गोपाळांनी गोपाळाने बालाजीचा नामजप करत फुघड्या खेळत नाचत गात रथ मंदिराभोवती प्रदक्षिणा करून नरसी चौकापर्यंत जाऊन परत मंदिराकडे आली तर पहाटे पासून संध्याकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या त्यामुळे दर्शन मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून मंदीर व पोलीस प्रशासनाच्या वतीने गर्दीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy