नरसी भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडवा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन !

[ नायगाव ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तिरुपती तिरुमला प्रति रूप समजले जाणाऱ्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडवा निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
                   आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र सीमेल लागत असलेल्या नांदेड ते देगलूर महामार्गावर नरसी येथे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे नवसाला पावणाऱ्या तिरुपती तिरुमल्ला समजले जाणाऱ्या श्री भगवान बालाजी मंदिरात गुढीपाडव्या निमित्त दिनांक नऊ एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजता 108 कलश महा पूजा, महाआरती , महाप्रसाद, सायंकाळी पाच वाजता भगवान बालाजीचे गरुड वाहन सेवा टाळ मृदंगाच्या तालावर बँड पथकाच्या सह अतिशयबाजीत भव्य दिव्य मिरवणूक नरसी श्रीभगवान बालाजी मंदिर येथून नरसी येथील मुख्य चौकात प्रदक्षिणा घालून वापस हीच मिरवणूक मंदिराकडे आल्यानंतर महा आरती महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती भगवान बालाजी मंदिर नरसी संस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या