तेलंगणातील धर्मापुरी येथील स्वयंभू नरसिंह मंदिरात श्रावण महिना निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रा, कर्नाटक, तामिळनाडूतील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे जवळ असलेल्या तेलंगानातील जगत्याल जवळ धर्मापुरी येथे गोदावरीच्या काठावर वसलेल्या नवसाला पावणाऱ्या स्वयंभू नरसिंह लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये पहाटेपासून वेद पंडित यांच्या मुखातून मंत्रोच्चारात अभिषेक पूजा आरती कुंकुम अर्चना दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या.

मंदिराच्या शेजारी असलेल्या तिरुपती तिरुमल्ला प्रतिष्ठान बालाजी मंदिर, जुना नरसिंह लक्ष्मी नारायण मंदिर, राम लक्ष्मण सीता मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर , विविध मंदिराच्या ठिकाणी सर्व भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
मंदिराच्या वतीने येणाऱ्या भाविकांना मोफत महाप्रसाद जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या मंदिराच्या परिसरात हेमाडपंथी नरसिंह भगवान लक्ष्मी यांना अर्पण केलेल्या वस्त्राची विक्री प्रसाद स्वरूपात माफक दरात भव्य रेशमी वस्त्र विक्रीसाठी काउंटर लावण्यात आले होते.

भाविकांना भगवंताचे प्रसाद स्वरूपात वस्त्र घेण्यासाठी प्रसादाच्या व फोटोच्या दुकानात भाविकांना खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरवर्षी नरसिंह जयंती वैशाख महिन्यामध्ये येत असते. यावेळी नरसिंह लक्ष्मीनारायण मंदिर येथे उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा जातो. यावेळी लाखोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी जमा होत असतात. भाविकांना दर्शन घेण्यासाठी अनुचित प्रकार घडवू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असतो. मंदिर प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत असते. असे धर्म पुरी येथील नरसिंह मंदिराचे सुप्रीटेंड डि. किरण यांनी सांगितले. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या