राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत जुई आणि स्वराज चमकले !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
    शहराचे भुमीपुत्र व छत्रपती संभाजी नगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण गंगाधर गट्टूवार यांचे दोन्ही मुले जुई गट्टुवार व स्वराज गट्टुवार यांनी राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नँस्टिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ज्युनिअर गटामध्ये जुईने सिल्वर मेडल जिंकले आहे. तसेच स्वराज गट्टूवार यांने मिक्स पेयर इव्हेंट मध्ये सुवर्णपदक व ट्रायो इव्हेंट मध्ये सिल्वर मेडल पटकाविले आहे. हि स्पर्धा जम्मू-काश्मीर येथे दि.२२ मार्च ते २५ मार्च दरम्यान जम्मु येथे पार पडली.
            छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेत इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थी स्वराज गट्टुवार व इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु.जुई गट्टूवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्या २३ व्या राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नँस्टिक स्पर्धेत घवघवीत यश मिळवित जम्मू येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत जुई व स्वराज्य त्यांनी चमकदार कामगिरी केली.
ज्युनिअर गटामध्ये जुईने सिल्वर मेडल जिंकले आहे. तसेच स्वराज गट्टूवार यांने मिक्स पेयर इव्हेंट मध्ये सुवर्णपदक व ट्रायो इव्हेंट मध्ये सिल्वर मेडल पटकाविले.तसेच महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये भारतातील २० राज्य व काही केंद्रशासित प्रदेश सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतले होते. महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकले आहे. स्वराज्य गट्टुवार व जुई गट्टुवार यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या