भारतीय अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मरवाळीतील माध्यमिक आश्रम शाळेत समूह राष्ट्रीय गीतांचे गायन करण्यात आले.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील “बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित” माध्यमिक आश्रम शाळेत 17 ऑगस्ट रोजी रोज बुधवारी सकाळी अकरा वाजता शाळेच्या भव्य प्रांगणात मध्ये शाळेतील सर्व शिक्षकवृंद, मूले-मूली यांच्यासह ढोल ताशाच्या निनादाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने समूह राष्ट्रीय गीतांचे गायन करुन साजरा करण्यात आला.
तालुक्यातील “बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित” माध्यमिक आश्रम शाळेतील प्राचार्य राठोड श्रीराम सिताराम, पर्यवेक्षक सूर्यकांत जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका कुसुमताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली १७ ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता शाळेच्या भव्य प्रांगणात शिक्षका करवी मूलांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाचे महत्त्व सांगून ठिक अकरा वाजता सर्व मुलं-मूलीतर्फे सामूहिक पणे समूह राष्ट्रीय गीतांचे गायन करुन अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. 
  यावेळी माध्यमिक शाळेतील शिक्षकवृंद:- नागोराव गबाळे,    विजयकुमार देशमुख, शंकर परसुरे, शंकर राठोड, धोंडिबा तेलंग, नागनाथ येल्लूरे, शेख शादूल, दादाराव जाधव, संभाजी मेहेत्रे, व्यंकट रेकूळवाड, आनंदराव सूर्यवंशी, सरेश पवार, पांडूरंग जाधव, शिवराम राठोड, अर्जुन चव्हाण, सुभाष कदम, दिपक बि-हाडे, प्राथमिकचे:- नागोराव चव्हाण, साहेबराव येवरे, एकनाथ मूनगिलवार, सतिश हाणमंते, शेख फिरोज, संजीवनी चव्हाण, वस्तीगृह अधिक्षक:- राजेश मरवाळीकर, प्रा. नामदेव राठोड, हेमंत बावणे, आकाश सुर्यवंशी, बालाजी शर्मा, काशीनाथ बन, बालाजी माळगे, विश्वनाथ स्वामी, भारती बन, गणेश मारताळेकर, शंकर राठोड, दिलीप माने, प्रदिप लापशेट्टवार कोट्टूलवार, आदीजण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या