बिलोली तालुक्यातील सनशाईन स्कूल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली तालुक्यातील राज्य महामार्गावरील असलेल्या कार्ला (खु.)येथील सनशाईन इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलला प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ब्रेन फिड स्कूल हा राष्ट्रीय पुरस्कार दि.5 जानेवारी रोजी हैदराबाद येथील हिट एक्स येथे जेष्ठ अभिनेते मुरली मोहन प्रदीप गुरु, हस्तलेखक विशेष मलिकार्जुन उस्मानिया विद्यापीठा चे कुलगुरु तथा ब्रह्नान ब्रेन फिडचेमुख्य संपादक प्रदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
बिलोली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात कमी वेळेत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारी संस्था म्हणजे सनशाइन इंटरनॅशनल स्कूल कार्ला (खु.)बिलोली ब्रेनफ़ीड या संस्थेच्या वतीने विविध निकषाच्या आधारे भारतातील महाराट्र, तेलंगाना, गुजरात यांच्या सहित कांही राज्याचे शाळेच्या सर्वे करण्यात आले होते.
या सर्वेत पाच शाळा पात्र थरल्या या पैकी सनशाइन स्कूल कार्ला बिलोली हे महारष्ट्र चे नांदेड जिल्ह्यात नावनौलीक करून ठसा उमटल्या बद्दल सनशाइन इंटरनॅशनल स्कूल कार्ला (खु.)बिलोली या संस्थेचे संचालक सत्यनारायन मेरगु,मुख्याध्यापिका प्रेमा मेरगु,व्यवस्थापिका कु.स्नेहा मेरगु व शाळेचे शिक्षक वर्ग व कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतल्यामुळेच हे शक्य झाले असून भविष्यात या संस्थे मार्फत चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न आहे असे संस्थेचे संचालक सत्यनारायण मेरगु यांनी सांगितले.
सनशाइन शाळेमार्फ़त नांदेड जिल्ह्यात प्रथम येवून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अ.भा.भ.निर्मूलन समिति प्रदेश सरचिटणीस राजू पाटील, जिल्हाअध्यक्ष शंकर मावलगे,मौलाना अहमद बेग , बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहमद,शेख युनुस बाबुमियाँ,कमलाकर जमदडे,सय्यद रियाज,धर्मपुरे आदिनी संस्थेच्या सर्व टीम चे सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या