“राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष तपासणी मोहीम संपन्न”.

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष तपासणी मोहीम अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शाळेतील शिक्षक वृंद कर्मचाऱ्यासह मुलांना राज्य सरकारच्या उपक्रमाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
 मा. उपमुख्यमंत्री श्री .अजित दादा पवार, मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य श्री प्रकाश आबिटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे उद्घाटन सोहळा पार पडला. राज्यातील सर्व जिल्हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) उद्घाटन सोहळ्यास व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) च्या माध्यमातून सदरील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. 
             “निरोगी बालपण सुरक्षित भविष्य, व एकच ध्यास महाराष्ट्राचा विकास”. च्या अनुषंगाने माननीय डॉ. निळकंठ भोसीकर सर (जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड) यांच्या आदेशावरून तसेच मा. डॉ. अपर्णा पुपलवाड (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नायगाव) यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनातून ० ते १८ वयोगटातील बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी लिटिल स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव येथे रुग्णालयाचे ब RBSK चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील वाघमारे, डॉ. अविनाश कोठाळकर, डॉ. शिवाजी बिडवई , डॉ पवन कुमार मेहेत्रे डॉ. दिपाली काटे, डॉ. तृप्ती बिरादार मॅडम व औषध निर्माणअधिकारी श्री. आतिक ऊर रहमान , श्री. तुराब पठाण, श्री. घनश्याम चाटे, आरोग्य सेविका एम एम कल्लूरे, रेखा राजबंडवार, उपस्थित होते, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांची वजन, उंची , घेऊन सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली, नेत्रदोष, रक्तक्षय चाचणी करण्यात आली.
किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले तसेच संदर्भसेवेसाठी पात्र विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. आरोग्य तपासणी दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुणाल गारठे व त्यांचे सहशिक्षक यांचे सहकार्य लाभले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या