नॕशनल काॕन्फरन्स फार मायनारिटी संस्थेच्या बिलोली तालुका प्रभारी पदावर ए. जी. कुरैशी यांची निवड.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेली सामाजीक संस्था नॕशनल कान्फॕरन्स फार मायॕनारीटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डेंबाले,जनरल सेक्रेटरी लुकस केदारी,संयोजक जुबेर मेमन यांच्या परवानगीने मराठवाडा प्रभारी अब्दुल बशीर माजीद यांनी बिलोली येथील जेष्ठ पत्रकार व सामाजीक कार्यकर्ता ए. जी. कुरैशी यांची बिलोली तालुका प्रभारी पदावर निवड करण्यात आली.
          इन्साफ या सामाजीक संस्थेच्या माध्यमातुन ए. जी. कुरेशी यानी विविध स्तरावर सामाजिक कार्य केले . तसेच पत्रकारीतेच्या माध्यमातुन गोर गरीबांचे अडचणी सोडवल्याने सामाजीक कार्याची दखल घेवुन नॕशनल कान्फॕरन्स फार माॕयनारीटी या सामाजीक राष्ट्रीय समितीच्या बिलोली तालुका प्रभारी पदावर निवड करण्यात आली.या निवडीबद्दल माजी उपाध्यक्ष गौसोदिन कुरेशी,माजी नगरसेवक शाहेद बेग ईनामदार ,अमजद चाऊस,माजी सभापती साबेर पटेल,मुबीन मौलाना, दादेसाब कुरेशी,निवृत्त शिक्षक नासेरखान,वहाब सिधिखी, पत्रकार सय्यद रियाज’ ईर्षाद मौलाना, शेख वाजीद अब्दुल्ला,एजाज फारुखी,मुशीरोदिन काजी फैजोदिन कुरेशी,पत्रकार संजय पोवाडे, सुनील जेठे,नागेश खंडेराय, रफीक ईनामदार, लईख सिधिखी,आदिनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या