नॅशनल काॅन्फरन्स फाॅर माॅयनारिटी संस्थेच्या कुंडलवाडी शहर प्रमुख पदी सिध्दार्थ कांबळे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेली सामाजिक संस्था नॅशनल काॅन्फरन्स फार माॅयनारिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डेंबाले,जनरल सेक्रेटरी लुकस केदारे व संयोजक जुबेर मेमन यांच्या परवानगीने मराठवाडा प्रभारी अब्दुल बशीर माजीद यांनी कुंडलवाडी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ कांबळे यांची कुंडलवाडी शहर प्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र दिले आहे.
           विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन सिध्दार्थ कांबळे यांनी विविध स्तरावर सामाजिक कार्य केले. पत्रकारीतेच्या माध्यमातुन गोर गरीबांचे अनेक समस्या सोडवल्याची व सामाजिक कार्याची दखल घेवुन नॅशनल काॅन्फरन्स फार माॅयनारिटी या सामाजिक राष्ट्रीय समितीच्या कुंडलवाडी शहर प्रमुख पदावर निवड करण्यात आली, या निवडी बद्दल, एन.जी.वाघमोडे, पत्रकार हर्ष कुंडलवाडीकर सय्यद इस्ताकअल्ली, माजीद नांदेडकर, सुभाष दरबस्तेवार, प्रा.डॉ.माधव हळदेकर, रूपेश साठे, अमरनाथ कांबळे, प्रकाश पोवाडे, संजय जाधव, संजय पोवाडे, माधव एडके,प्रा.मोहसीन खान, सुनील कदम, संविधान दुगाणे, गौतम भालेराव, रत्नाकर जाधव, भास्कर भेदेकर, इंजिनिअर सचिन भद्रे, डॉ.उत्तमकुमार इंगोले, डॉ.हानमंतराव लखमपुरे, डॉ.संतोष डांगे, डॉ.नरेश बोधनकर, कवी चंद्रकांत कांबळे कुंडलवाडीकर, विलास शेरे आदींनी अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या