राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यशाळा संपन्न !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व एज्युकेशन सोसायटी नायfगाव संचलित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळा 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कलेपवार, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय कार्यालय नांदेड,जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.गणेश देवडे, केंद्र समन्वयक प्रा.गजानन शिंपाळे, सहकेंद्र समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर बैस उपस्थित होते.
 डॉ. जोगेंद्र बिसेन यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल च्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. पी.डी. जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन सुजलेगावकर, प्रा.नागप्पा दुड्डे, प्रा. मधुसूदन इंगळे, प्रा. गणेश कुराडे, प्रा. गणेश कदम, प्रा.आर. आर.शिंदे, आनंद गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
WWW.MASSMAHARASHTRA.COM 

ताज्या बातम्या