नगरपालिका प्रशासना कडून प्रत्येक घरी झेंड्याचे वाटप !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
आगामी होऊ घातलेल्या 75 व्या स्वतंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्य नगरपरिषद कार्यालय, शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांच्या सर्वांच्या योगदानातून शहरातील घरांसाठी एकूण 2500 तिरंगा ध्वजाचे वितरण हर घर तिरंगा मोहीमे अंतर्गत करण्यात आले.

यावेळी शहरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर दिनांक 13 आगस्ट ते 15 आगस्टच्या सायंकाळ पर्यंत तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी नगरपालिका प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नायब तहसीलदार पापा चव्हाण, आदींसह यावेळी कार्यालयीन अधिक्षक सुभाष निरावार, गंगाधर पत्की, विश्वास लटपटे, प्रतीक मावळदे, राम पिचकेवार, मुंजाजी रेंनगडे, बालाजी टोपाजी, वीरसेन शिरसाट, प्रकाश भोरे, मारोती करपे, हेमचंद्र वाघमारे, शंकर जायेवार, धोंडीबा वाघमारे, मोहन कपाळे, महेंद्र वाघमारे, रामा वाघमारे, विजय वाघमारे, संदीप वाघमारे, रोहित हातोडे, निर्मलाबाई वाघमारे, शुभम धिलोड,भारत काळे, बाळू काळे, राम संत्रे, शंकर मुकेरवार, गंगाधर तुमेदवार, गोविंद काळे, सय्यद माजिद, साहेबराव वाघमारे आदी नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या