नरसी येथे भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने काँग्रेसच्या वतीने झेंड्याचे वाटप !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नरसी येथे भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा “या उपक्रमातून नरसी येथील जिवन विकास प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना काँग्रेस पक्षातर्फे भारतीय ध्वज आपल्या घरावर पकडण्यासाठी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संभाजी भिलवंडे बोलताना म्हणाले की,स्वातंत्र्याच्या लढ्याची मुहूर्तमेढ महात्मा गांधीजींनी रोवली व त्यांच्यासह अगणित स्वातंत्र्य विरांनी आपल्या परीवाराची चिंता नकरता आपल्या घरावर पाणी सोडून आपल्या प्राणाची आहुती देवून स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला त्यात सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस,पंडीत जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, लाला लजपततराॅय, सुखदेव मौलाना अब्दुल कलाम, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विनोबा भावे, खान अब्दुल जब्बार खान, सरोजिनी नायडू, बाबासाहेब आंबेडकर यांप्रमुख स्वातंत्र्यता सेनानीसह असंख्य स्वातंत्र्यवीरांनी जुलमी इंग्रजी राजवटी विरुद्ध लढून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं व त्याला आज पंचाहत्तर वर्ष पुर्ण होत असून हे वर्ष आपण सर्व जन भारतीय स्वतंत्र्याचा अमृत मोहत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करताना मला देशाचे पहिले पंतप्रधान थोर स्वातंत्र्य सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ९३ वर्षापुर्वी ३१ डिसेंबर १९२९ रोजी पवित्र रावी नदी काठी पहील्यांदा भारतीय ध्वज फडकावून देशवासीयांना संबोधीत करताना म्हणाले की, आज तिरंगा फडकवला आहे आता हा कधीच कोणापुढे झुकणार नाही हार पत्कारणार नाही.
म्हणून आज आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण तिरंग्याचे बहुमान राखून आपापल्या घरावर येत्या १३ ऑगस्ट ते १५ऑगस्ट पर्यंत तिरंगा फडकवयाच आहे व स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे.
 या प्रसंगी जेष्ठ पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे, बाबुभाई, मु.अ.नंदकीशोर नरसीकर, से.सो.नरसीचे संचालक रामराव मावले,यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या