कुंडलवाडीत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून के.रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडी येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहशिक्षक कागळे राजेश व शाळेचे मुख्याध्यापक अभिलाष गोसुला यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर गणितीय रांगोळी काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच सकाळच्या सत्रात इयत्ता चौथीच्या व पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी व गणिताचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
तर दुपारच्या सत्रात सहावी ते दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे गट पाडत सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .विजयी स्पर्धकांना व गणित शिक्षकांना शाळेच्या संचालिका रमा ठककुरवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देवुन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश कागळे सर व सौ संध्या पाठक मयांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी संगमवार यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या