के. रामलू शाळेचे नॅशनल सायन्स ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत यश

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
दि.‌05/12/2023 रोजी झालेल्या नॅशनल सायन्स ओलंपियाड या स्पर्धा परीक्षेत के. रामलू शाळेचे इयत्ता पहिलीचे 10 विद्यार्थी व दुसरीचे 11असे एकूण 21 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.त्यात पहिली वर्गातील स्नेहल सुरेश सोनकांबळे 33, अनुष्का गजानन कदम 33, गणराज भूमेश धात्रक 32, श्रावणी संजय मुद्दलवार 31 गुण घेऊन शाळा स्तरावर गोल्ड मेडल प्राप्त केले.
तर सौजन्या शंकर दर्शनवाड 30, उम्मे ऐमन फहीम शेख 30, आर्यन दीपक ब्यागलवार 30, कृष्णा राजेश्वर हमंद 29, सुमित गंगाधर ठक्कूरवार 29, शरयु सुनिल जोगदंड 28 गुण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. तसेच दुसऱ्या वर्गातील म्हाळसा गंगाधर लोणेकर 34, रुद्रा गंगाधर मदनुरे 33, मारोती वड्डोजी खांडरे 33, वेदांत मनोज पाठक 33, प्रज्ञा सायबु खटके 32, अनस इब्राहिम शेख 32, संस्कार विनोद लघुळे 32 गुण घेऊन शाळा स्तरावर गोल्ड मेडल पटकावले तर कार्तिक पिराजी मामडे 31, श्रीकर राजेश कागळे 31, श्रेया राजू धात्रक 31, यशश्री विठ्ठल इप्तेकर 30 गुण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे के. रामलू शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सायरेड्डी ठक्कूरवार सर संचालिका रमा ठक्कूरवार मॅडम प्रिन्सिपल टी. नरसिंगराव सर यांनी अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या