राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा संवाद कार्यक्रम संपन्न !

[ गोविंद बिरकुरे ]
राष्ट्रीय राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून यिन युवा संवाद हा कार्यक्रम नांदेड जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गुगल मिट या ऑनलाईन प्रसार माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. गणपत महाराज माखणे यांनी उपस्थित राहून सर्व युवकांना संबोधित केले . त्यांनी युवकांशी संवाद साधून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा समन्वयक पवन वडजे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संभाजी मनुरकर सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष साखरे यिन जिल्हाध्यक्ष नांदेड, गौरव पुंडे, साई सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या