राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – दिलीपराव धर्माधिकारी !

बिलोली तालुका गेले विस वर्षांपासून जसा आहे तसा आहे ,बिलोली पेक्षा नायगाव तालुका विकसित होऊन पुढे गेला आणि नायगाव मध्ये व्यापार मार्केट, आणि कारखाने आहेत म्हणून नायगाव तालुका विकसित झाला पण बिलोली तालुक्याचा विकास काय झाला नाही.बिलोली तालुक्याचा विकास करण्यासाठी येणाऱ्या काळात नगर पालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्तेना लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ देणारे पक्ष आहे असे शिवराज पाटील होटाळकर यांनी कार्यकर्तेना संबोधित केले .
[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
 स्वराज्य सप्ताह अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम बिलोली येथे दि.२५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला असता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजीत पवार) सत्तेत असून बिलोली तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहिल ,हा पक्ष तळागाळात पोहोचला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी उपस्थित कार्यकर्तेना संबंधित केले होते.
या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक निष्ठीय जेष्ठ कार्यकर्ते जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर तर मान्यवर म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनंदा जोगदंड,जिल्हा संघटक प्रतिभा रत्नपारखी ह्या उपस्थित होत्या.

 सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी आपल्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आले. तदनंतर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केले, या सर्वांचं जिल्हाध्यक्षांनी पक्षाची शाल पुष्पहाराने स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष रंजीत पाटी हिवराळे,शहराध्यक्ष मिलींद पवार, गंगाधर मरकंटे,तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा ईर्लेवाड,निळकंठ दुडले, गणेश शिंदे,गणेश नरवाडे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार रत्नाकर जाधव सय्यद रियाज राजू पा.शिपाळकर, सुनिल जेठे,प्रविण सोनकांबळे, यांच्या सह अनेक कार्यकर्ते,व नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावना मिलिंद पवार यांनी केले असून सुत्रसंचालन प्रा.शंकर पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार गंगाधर कुडके यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या