राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शहराध्यक्षपदी गंगाधर मरकंटे यांची निवड
कुंडलवाडी (अमरनाथ कांबळे )
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)कुंडलवाडी शहराध्यक्ष पदी गंगाधर जळबा मरकंटे यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषयी असलेली निष्ठा व कार्य करण्याची क्षमता लक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आली आहे. सदरील निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष माधवराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,जिल्हा सरचिटणीस गंगाधर प्रचंड, गोसोदिन कुरेशी,तालुकाध्यक्ष रणजीत पाटील हिवराळे,माजी सभापती तथा तालुका कार्याध्यक्ष व्यंकट पांडवे,युवक तालुकाध्यक्ष नीलकंठ पाटील दुडले आदी उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com