चुंगी नाका ते 33 केव्ही पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करा – अमरनाथ कांबळे ; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा   

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
                कुंडलवाडी ते धर्माबाद या राज्य महामार्ग क्रमांक 223 चे काम चालू असून सदरील काम चुंगी नाका ते 33 केव्ही पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम होताना दिसून येत नाही,सदरील काम चुंगी नाका ते केव्ही पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार बिलोली यांना निवेदन देऊन केली आहे.

            कुंडलवाडी धर्माबाद या राज्य महामार्गाचे काम चालू असून संबंधित गुत्तेदाराने चुंगी नाका ते कऱ्हाळ रोड पर्यंतच सीसी रोड व नाली बांधकाम करताना दिसून येत आहे,सदरील रस्त्याच्या मार्गावर आंबेडकर नगर, साठे नगर, नई आबादी,आदी नागरिकांची वस्ती असून या भागातील नागरिकांच्या घरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होत असते,सदरील नाली बांधकाम 33 केव्ही पर्यंत झाले नाही तर या भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित गुत्तेदाराने सदरील काम चुंगी नाका ते 33 केव्ही पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करण्यात यावे अशी मागणी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार बिलोली यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी निवेदन देऊन केली आहे.

अन्यथा आगामी काळात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गोसोदिन खुरेशी, युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या