राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सुभाष गायकवाड यांची निवड

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरद पवार गट ) तालुकाध्यक्ष पद गेल्या काही दिवसापासून रिक्त होते या रिक्त असलेल्या जागेवर तालुकाध्यक्षपदी माजी जी प सदस्य प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र दिनांक 28 रोजी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी दिली आहे..

          राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी दोन गटात झाल्यामुळे बिलोली तालुकाध्यक्ष पद हे गेल्या काही दिवसापासून रिक्त होते, रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाकडून दिनांक 13 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून गुप्ता आहवाल घेण्यात आला होता. सदरील गुप्ता अहवाल जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुफुर्त झाल्यानंतर दिनांक 28 रोजी जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी बिलोली तालुकाध्यक्ष पदी सुभाष गायकवाड यांची नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे.

 

            सुभाष गायकवाड हे या अगोदर ही 2000 ते 2012 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदी होते, त्यांच्या कार्यकाळात बिलोली नगर परिषदेत काही नगरसेवक निवडून आले तर कुंडलवाडी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकिवले होते. या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याना एक स्फूर्ती मिळाली असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यात वाढण्यास प्रारंभ होईल अशी आशा निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोशीकर,जिल्हा उपाध्यक्ष गजानन पांपटवार, जिल्हा सरचिटणीस डी बी जांभरुणकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष प्रा मजरोद्दीन,उमरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गोरठेकर, जिल्हा सरचिटणीस डॉ परशुराम वरपडे, देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई, नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे, आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीबद्दल तालुका उपाध्यक्ष गिरी महाराज, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमुलवार, युवक तालुकाध्यक्ष हणमंत पाटील कदम,कुंडलवाडी शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख मोहसीन, माजी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सादिक पटेल,तालुका कोषाध्यक्ष बाबुराव पाटील टोम्पे, बाबू चरकुलवार, चक्रधर पाटील टेकाळे,अब्दुल रशीद,अल्पसंख्याक शहराध्यक्ष वसीम खान,गंगाधर शेट्टीवार, आदी कार्यकर्तेनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या