घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते 1 कोटी 50 लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न.

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी : गजानन चौधरी ]
घुंगराळा येथे राज्य सरकारच्या विविध योजना मधून तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात वसंत सुगावे पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा कारून सरकारकडून आणलेल्या 1 कोटी 50 लक्ष रुपये निधींच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

       यामध्ये घुंगराळा येथील खंडोबा मंदिर परिसरात राज्य शासनाच्या पर्यटन व तीर्थक्षेत्र या खात्यांअतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजना या योजनेतून 1 कोटी रुपयांचा निधी खंडोबा मंदिर परिसरात सी. सी. रोड, पेव्हर ब्लॉक,मंदिर असा एकूण 1 कोटी 72 लक्ष रुपये निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाला यातील 1 कोटी 50 लक्ष रुपयांच्या निधींच्या कामांचे भूमिपूजन करून काम चालू करण्यात आले आहे.

        या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प.सदस्य सुभाषराव गायकवाड, जावेद सर, बाळासाहेब पांडे, गजानन चौधरी, एम. एम. मुदखेडकर, माधव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक हरिहरराव भोसीकर आपल्या मनोगतातून एवढया मोठया प्रमाणात निधी आणल्याबद्दल वसंत सुगावे पाटील यांचे कौतुक करून वसंत सुगावे यांना जिल्हा परिषदेत पाठवा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे असे आवाहन केले वसंत सुगावे एक कार्यक्षम कार्यकर्ते आहेत असे आपया मनोगतातून व्यक्त केले. यावेळी पत्रकार बाळासाहेब पांडे,गजानन चौधरी, एम. एम. मुदखेडकर यांनीही मनोगत व्यक्त करून वसंत सुगावे हे सामाजिक, धार्मिक,राजकीय कामात झोकून देऊन चांगल्या पद्धतीने काम करणारे युवा नेते आहेत. असे आपल्या मनोगतातून वसंत सुगावे यांच्याबद्दल गौरवादगार काढले.
    या कार्यक्रमास सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब, मातावाड साहेब, केरबा पा. सुगावे, संभाजीराव तुरटवाड, मा. उपसरपंच शेषेराव पा. ढगे, कंत्राटदार अविनाश पवार, जयराज मोरे, स्वछतादूत व्यंकटराव पा. सुगावे, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन माधवराव पा. ढगे,व्हाईस चेअरमन श्यामराव यमलवाड, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष माधवराव पा. ढगे, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा.ढगे ,ग्रामविकास अधिकारी हणमंत शिंदे, माजी उपसरपंच शिवाजी पा. ढगे,विक्रम मामा यमलवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी व्यंकटराव कंचलवाड, शंकरराव जक्केवाड, गंगाधर पांचाळ, शंकरराव यलपलवाड, गंगाधर पा. ढगे,ग्रामपंचायत सदस्य गंगाराम सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पा. ढगे,प्रल्हाद पा.ढगे, बालाजीराव हाळदेवाड,बालाजी बोंडले गुरुजी,शंकर यमलवाड, माधवराव जलदेवार, गंगाधर कवळे, गोविंद कंचेलवाड, राजू आलेगटलेवार, संभाजी पा. सुगावे, गोविंदा पा. शिंदे, माधवराव यमलवाड, शिवराज यलपलवाड, भुजंगराव लुटे, अच्युत पांचाळ, फैमु शेख, राजू कोंडे, संभाजी सूर्यवंशी, विलास यमलवाड, खंडेश्वर ढगे, विलास ढगे, सुभाष ढगे, राजेश ढगे, रोहिदास ढगे, शंतनू ढगे, ओमकेश ढगे, योगेश ढगे, उमेश कदम, सोहेल शेख,आनंदा निर्दोडे, ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र पा. ढगे,यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या