राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल नांदेड दक्षिण तालुका उपाध्यक्ष पदी गणेश येवले !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदारसंघातील भेंडेगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश रामराव येवले यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार यांना अपेक्षित असलेल्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हि संधी दिली आहे.
जेष्ट नेते मा.कमल किशोरजी कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,सुनिल कदम, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल दिपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.
समाज कार्यात सदा अग्रेसर असलेले युवा नेतृत्व गणेश रामराव येवले राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे नांदेड दक्षिण तालुका उपाध्यक्ष म्हणून यांच्यावर त्यांच्या सामाजिककार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या