निसर्गाची किमया – सवत सडा धबधबा !

हा नैसर्गिक धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. हा धबधबा मुंबई-गोवा हायवे लगत फरशी या ठिकाणी सवतसडा या नावाने ओळखला जातो. पावसाळ्यामध्ये त्या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी व पाहण्यासाठी बरेच पर्यटक त्या ठिकाणी गाड्या थांबून त्या पाण्यामध्ये भिजत असतात आणि निसर्गाचा आस्वाद घेत असतात या धबधब्याचे नाव सवत सडा असे आहे याची फार मोठी कथा आहे हा धबधबा खेड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आणि चिपळूण तालुक्याच्या सुरुवातीला आहे .हा धबधबा परशुराम मध्ये येतो या धबधब्याच्या वरील साईडला परशुरामाचे देवस्थान आहे तेदेखील प्रसिद्ध देवस्थान आहे परशुरामला बरेच टुरिस्ट महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येत असतात आणि देव दर्शन घेऊन जातात.त्यावेळेस हा धबधबा पाहण्यासाठी वर्षभर जणूकाही जत्रेचे ठिकाण आहे की काय असे वाटते.पाहण्यासाठी अनेक प्रवासी थांबतात अनेक वेळा मुंबई-गोवा हायवे ला परशुराम आणि चिपळूण तालुक्यातील पेढे ग्रामपंचायत हद्दीत हा धबधबा येत असल्याने त्या धबधब्यावर पोलीस संरक्षण ठेवण्यात येते .परंतु सद्यस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा धबधबा पाऊस पडलेला असूनदेखील निर्मनुष्य आहे .हा धबधबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत पोहोचलेला आहे .पावसाळा सुरू झाला की अनेक एक टूरिस्ट याठिकाणी येऊन भेट देतात . धबधब्यांच्या आजुबाजूला नैसर्गिक हिरवळ आहे जणू काय या धबधब्यांचे हिरवीगार झाडी ने पांघरून आच्छादलेले आहे की काय असे वाटते असे अनेक कोकणामध्ये धबधबे प्रवाशांना खुणवत आहेत परतू कोरोना प्रादुर्भाव आला घाबरून टुरिस्ट घरातून बाहेर पडत नाहीत. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या.

ताज्या बातम्या