भगवान बालाजी मंदिरात दसरा नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन !

( नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी )
तालुक्यातील नरसी येथे आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या तिरुपती तिरुमल्ला प्रति स्वरूप समजले जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी 26 वा नवरात्र महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

नांदेड ते देगलूर महामार्गावर नरसी फाटा येथे सर्व भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या तिरुपती तिरुमल्ला प्रतिस्वरूप समजले जाणाऱ्या भगवान बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्ताने दिनांक 26 सप्टेंबर सोमवार ते पाच ऑक्टोबर पर्यंत वेदशास्त्र प्रातःस्मरणीय गुरुवर्य नागनाथ शास्त्री कोडगीरकर महाराज व वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री द्रविड श्री क्षेत्र काशी यांच्या मार्गदर्शनाने भगवान बालाजी मंदिराच्या दसरा नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमांमध्ये दररोज अभिषेक पूजा व्यंकटेश स्तोत्र, घटस्थापना, गरड ध्वजारोहण, विष्णूयाग ,होम हवन , कुमकुम अर्चना, पुष्पहार अर्चना, तुळशी अर्चना ,पालखी सेवा, वसंत उत्सव, कल्याण उत्सव, दीपोत्सव, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी 108 कलश महा अभिषेक पूजा तर दि 5 ऑक्टोबर बुधवार रोजी विजयादशमी रोजी निमित्त सकाळी रथोत्सव यात्रा सोहळा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत.
नवरात्र महोत्सवाची जय तयारी चालू असून रंग रंगोटी ,विद्युत रोषनाई, भव्य मंडप, जागोजागी कमानी चे काम चालू आहे या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री भगवान बालाजी मंदिर नरसी विश्वस्ताकडून करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या