नरसी भगवान बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सवाचे थाटात सुरुवात !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या नांदेड हैदराबाद महामार्गावर नरसी फाटा येथे तिरुपती तिरुमला प्रति रूप समजले जाणाऱ्या श्री भगवान बालाजी मंदिरात 27 व्या नवरात्र महोत्सवाची विविध कार्यक्रमाने थाटात सुरुवात झाली.

नांदेड हैदराबाद महामार्ग असलेल्या नरसी फाटा येथील नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या श्री भगवान बालाजी मंदिरात 27 नवरात्र महोत्सव निमित्ताने पहाटे पाच वाजता महाभिषेक पूजा विष्णू सहस्त्रनाम पाठ महारथी श्री काशी क्षेत्र येथील वेद पंडित द्रविड शास्त्री महाराज यांचे प्रवचन महाआरती नंतर भगवान बालाजी लक्ष्मी पद्मावती यांच्या उत्सव मुर्त्याचे शेषनाग वाहनावर बसून रंगीबेरंगी फुला माळाने सजवलेल्या भव्य दिव्य रथात मंदिराच्या परिसरातून नरसी चौकापर्यंत बँड पथक टाळ मृदंगाच्या तालावर बाळ गोपाळ भजनी मंडळासह अतिश बाजीत भाविक भक्तासह भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण ,श्रीराम सावकार मेडेवार, राजेश पाटील भिलवंडे ,शंकर पाटील कल्याण ,मोहन पाटील भिलवंडे, वसंत सावकार मेडेवार, बाबुराव शक्करवार, श्रावण पाटील भिलवंडे,राजेश्वर सावकार मेडेवार, संभाजी पाटील भिलवडे,सदानंद मेडेवार, बाबू सावकार आरगुलवार, उत्तम सावकार वट्टमवार, संगमनाथ सावकार कवटीकवार,विठ्ठल सावकार लाभशेटवार, बालाजी चिंतावार, बालाजी वट्टमवार, सचिन चिद्रावर,विनोद बच्चेवार , रमेश मेडेवार, श्रीनिवास गडपल्लेवार, चंद्रकांत बच्चेवार, डॉक्टर पोलावर, लक्ष्मीकांत बच्चेवार गजानन चौधरी, प्रकाश मेडेवार, जगन्नाथ दाचावार, अनिल सावकार श्रीमनवार, देवशेटवार, साईनाथ मेडेवार पवन गादेवार साईनाथ वट्टमवार, मनोज आरगुलवार, मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक मंडळ , नायगाव येथील सर्व व्यापारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या