सिल्वर ओक वर झालेल्या हल्ल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध ; बिलोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर राज्य परिवहन महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याबद्दल बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार श्रीकांत निळे यांना निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, जिल्हा सरचिटणीस गौसोदिन कुरेशी, माजी सभापती व्यंकटराव पांडवे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष गंगाधर प्रचंड, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण देगलूरे, दत्तगिरी महाराज, युवक तालुकाध्यक्ष रणजीत पाटील हिवराळे, युवक तालुका उपाध्यक्ष निळकंठ पाटील दूडले, सादिक पटेल, कुंडलवाडी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमूलवार, शिवाजी पंदीलवार, मुरलीधर चंचलवाड, विनोद देवकरे, पिराजी पाटील, मारोतराव बोडके, हणमंतराव पाटील कदम, हणमंत पाटील खुळगे, निवृत्ती नरहरे, लक्ष्मण सोनकांबळे, शेख नवाब, आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या