राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस धर्माबाद येथे साजरा।

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या  दिवशी धर्माबाद येथील महात्मा बसवेश्वर निवासी संस्कार आश्रम येथे विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले व मा.शरदचंद्र पवार यांचे महिला धोरन व साहेबांच्या एकुन कार्यकिर्दीतील महत्वाचे निर्णय या संदर्भात पत्रक काढून जनजागृती करण्यात आली.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर, कार्याध्यक्ष हानमंतराव पा किरोळे, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्टी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस सुधीर येलमे, नगरसेवक आबेद आली साहेब, नगरसेवक प्रतिनिधी सुधाकर जाधव साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर, शहराध्यक्ष मोसीन खान, महिला तालुकाध्यक्षा योगीता किरोळे, कार्याध्यक्ष राजश्री पाटील, विद्यार्थी तालुकाध्यक्ष नितेश पाटील बिजेगावे, ग्रंथालय तालुकाध्यक्ष शिवा पाटील पाटोदेकर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाबुराव गोणारकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय संज्जन,सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रविराज कदम चोळाखेकर, महिला तालुका उपाध्यक्ष अजमेरी बेगम, युवक तालुका उपाध्यक्ष क्रष्णा जाजेवार, तालुका सरचिटणीस बंटी सोनकांबळे,युवक शहर सचिव रेहान कुरेशी, विद्यार्थी तालुका सचिव नागेश्वर जाधव, ज्योतीताई आप्पा, कुसुमताई पांचाळ,ज्योती हिवराळे,सविता ऊशलवार सह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या