आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याची मागणी ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बिलोली तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना ह्या योजना सुरू असून, मागील चार वर्षात तालुक्यात आठ हजारच्या वर घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी दोन हजारच्या वर घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले तर उर्वरित सहा हजारच्या आसपास घरकुलाचे बांधकाम रेती अभावी रखडले आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी शासनाने दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी एक परिपत्रक काढून घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास रेती फ्रिपास द्वारे देण्यात यावे असा अध्यादेश काढण्यात आला होता. या परिपत्रकानुसार तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, जिल्हा सरचिटणीस गौसोद्दीन खुरेशी, माजी सभापती व्यंकटराव पांडवे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष गंगाधर प्रचंड, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमलवार, कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार, युवक तालुका सचिव निळकंठ दुडले, विध्यार्थी तालुकाध्यक्ष विकास पाटील दगडपूरकर, तालुका उपाध्यक्ष दत्तगिर महाराज गिरी, कुंडलवाडी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, शहर उपाध्यक्ष गंगाधर मरकंठे, नागनाथ शेटकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या