राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा स्थापना दिवस साजरा !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक युवती यांच्या साठी ‘जागर स्वयंरोजगाराचा’ आणि ‘पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब वैद्यकीय मदत कक्ष’ हे मदतकार्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून दोन मोबाईल ॲप तयार करण्यात आले.
याचे उद्घाटन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब, राष्ट्रीय सरचिटणीस खा.सुनिल तटकरे साहेब, आमदार मानसिंग भाऊ नाईक, राष्ट्रवादी महीला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपस्थीत होत्या.
सदरील मदत कक्षाचे प्रमुख म्हणुन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस गौतम आगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातुन महात्मा फुले जिवनदायी योजना, ट्रस्ट च्या माध्यमातून मदत, बील कमी करणे इत्यादी मदत रुग्णांना केली जाणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख ओंकार माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओमकार माळी हे सुरवाती पासुन काम करत आहेत. विशेष म्हणजे रोजगाराच्या संदर्भात ॲप मार्गदर्शन शिबीर आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्या कंपनी मध्ये जागा रिक्त असेल तर त्याची सुध्दा माहीती ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. यावेळी कार्यअध्यक्ष रवीकांत वर्पे व पदाधिकार उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या