बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष निवडीची आढावा बैठक संपन्न

कुंडलवाडी (अमरनाथ कांबळे )
       बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पक्षाचे तालुकाध्यक्ष पद गेल्या काही दिवसापासून रिक्त होते, रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीच्या अनुषंगाने दिनांक 13 रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह बिलोली येथे आढावा बैठक संपन्न झाली आहे.

            या बैठकीला अध्यक्ष म्हणून जिल्हा सरचिटणीस डी बी जांभरुणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पक्ष निरीक्षक तथा जिल्हा उपाध्यक्ष गजानन पापंटवार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संग्राम हायगले आदी उपस्थित होते. सदरील बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी सुभाष गायकवाड,संग्राम हायगले यांच्या नावासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे गुप्त अहवाल घेण्यात आले आहे.

सदरील गुप्त अहवाल जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्याकडे पाठवण्यात आला असून काही दिवसात जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर हे बिलोली तालुका अध्यक्ष पदाची निवड करतील असे जिल्हा सरचिटणीस डी बी जांभरुणकर यांनी सांगितले आहे. 

        यावेळी या बैठकीला तालुका उपाध्यक्ष गिरी महाराज, युवक तालुकाध्यक्ष हणमंत पाटील कदम, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमूलवार, कुंडलवाडी शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख मोहसीन,माजी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सादिक पटेल,तालुका कोषाध्यक्ष बाबुराव पाटील टोम्पे, बाबू चरकुलवार, चक्रधर पाटील टेकाळे,अब्दुल रशीद,अल्पसंख्याक शहराध्यक्ष वसीम खान,गंगाधर शेट्टीवार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते….
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या