आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बिलोली येथे नुकतीच पार पडली. सदर बैठकीत आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करून पुढील निवडणुकीची व्युहरचना आखण्यात आली आहे.
तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे आशा सूचना तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
यावेळी या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, जिल्हा सरचिटणीस गौसोद्दीन खुरेशी, माजी सभापती व्यंकटराव पांडवे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष गंगाधर प्रचंड, बिलोली शहराध्यक्ष आनंद गुडमलवार, कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार, युवक तालुका सचिव निळकंठ पाटील दुडले, विध्यार्थी तालुकाध्यक्ष विकास पाटील दगडपूरकर, तालुका उपाध्यक्ष दत्तगिर महाराज गिरी, कुंडलवाडी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, शहर उपाध्यक्ष गंगाधर मरकंठे, नागनाथ शेटकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या