राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष्य शरद पवार यांचा वाढदिवस बिलोली तालुक्यात विविध उपक्रमातुन साजरा !
[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस बिलोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे दि 08-12-21 रोजी बिलोली येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळें वाटप करून व दररोज वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे.
दि 09-12-21 रोजी युवक रा. कॉ तालुका अध्यक्ष श्री रणजित पाटील हिवराळे यांच्या कल्पनेतून व त्याच्या युवक सेल तर्फे मौजे आरळी (जिल्हा परिषद सर्कल चे मुख्यालय) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटंन रा. कॉ तालुकाध्यक्ष श्री नागनाथराव पाटील सावळीकर यांच्या हस्ते पार पडला. तसेच जी.प. प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व शिक्षक/ आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी युवक तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे, इंजि संतुकराव ना पाटील, विध्यार्थी ता अध्यक्ष विकास पा जाधव, कुंडलवाडी युवक अध्यक्ष अमरनाथ कांबळे, उपाध्यक्ष गंगाधर मरकंटे, सा न्याय उपाध्यक्ष विनोद देवकरे, युवक सचिव नीलकंठराव दुडले, मारोतराव बोडके युवक चिटणीस, विद्यार्थी उपाध्यक्ष शिवाजी पंदीलवाड, ग्रामपंचायत सदस्य मारोतराव पाटील बोडके, श्री मनोज पाटील बोडके, नागनाथ बोडके, राम पाटील याबाजी, व्यंकटराव पाटील लाकडे, शेख लतीफ, संतोष आवुळके, गंगाधर खेमशेट्टे, हनुमंत खेमशेट्टे, भुमन्ना ईबतेवार, शेख रहीम, राजेश दुडले, दत्तराम संगेवार, पिराजी पाटील पांडागळे, नागनाथ पांडागळे, गंगाराम मोतेवार, चंद्रकांत दुडले, गंगाधर दूडले, शेख रसूल, भुजंगराव बोधने, संभाजी बोधने, संभाजी बोडके, गुणाजी बनसोडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शिवनंदा स्वामी , उपाध्यक्ष शेख भाई, रमेश दूडले, अरुण कोरुळे, मारुती लाकडे, शंकर भालके, प्रकाश हांडे व अनेक गावकरी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून