कुंडलवाडी नगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार ; वीजबिलाच्या नावाखाली काढले दलित वस्तीतील सार्वजनिक पथदिवे !

• राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दलित वस्तीतील आंबेडकर नगर,साठे नगर,व नई आबादी येथील सार्वजनिक पोलवरील पथदिवे वीज बिल जास्त येत असल्याच्या कारणाने पथदिवे काढून टाकल्याने नगरपालिका प्रशासनाच्या अजब कारभाराची प्रचिती आली असून,काढण्यात आलेले पथदिवे तात्काळ बसवावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी दिला आहे.
         कुंडलवाडी येथील नगरपालिके अंतर्गत असलेल्या आंबेडकर नगर, साठे नगर ,नई आबादी व दलित वस्ती समशन भूमी येथे एक कोटी रुपये खर्च करून सोलार पथदिवे बसविण्यात आले,बसविलेले सोलार पथदिवे एक महिन्याचा कालावधीही झाला नाही त्यात काही सोलार पथदिवे बंद अवस्थेत आहेत.नगरपालिका प्रशासनाने दलित वस्तीत सोलार पथदिवे बसविले म्हणून दलित वस्तीतील सार्वजनिक पोलवरील पथदिव्यामुळेच वीज बिल जास्त येत आहे या कारणाने पथदिवे काढून टाकुन आपल्या मनमानी कारभाराची प्रचिती दिली आहे.असे असले तरी बसवलेल्या सोलर पथदिव्यांच्या प्रकाशाची क्षमता किती आहे याची पडताळणी नगरपालिका प्रशासनाने करावी व नागरिकांना सांगावे.
असे असले तरी दिवसाढवळ्या शहरातील सार्वजनिक पथदिवे चालू आहेत याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष करत कुंभकर्णच्या झोपेचे सोंग घेत आहे, दिवसा चालू असलेल्या सार्वजनिक पथदिव्यामुळे नगरपालिकेला वीज बिल जास्त येत नाही, पण दलित वस्तीतील सार्वजनिक पथदिव्यामुळेच नगरपालिकेला जास्त वीज बिल येते का ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.नगरपालिका प्रशासनाच्या अशा दुटप्पी कारभारामुळे दलित वस्तीतील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून काढण्यात आलेले सार्वजनिक पथदिवे नगरपालिका प्रशासनाने त्वरित बसवावे अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी दिला आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या