राष्ट्रवादी काँ.किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]

अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकरी यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीकरता राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस *वसंत सुगावे पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्पनाताई डोंगळीकर, जि.प.सदस्य विजय धोंडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे, बाबुराव केंद्रे, मनोहर पा.भोसीकर, कंधार तालुकाध्यक्ष शिवदास पा.धर्मापुरीकर, शिवराज पा.धोंडगे,भोकर तालुकाध्यक्ष विश्वांभर पवार, सदाशिव पाटील यांच्यासह सिंधूताई देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या