नांदेड जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने इंधन दर वाढीच्या विरोधात अनोखे आंदोलन !
नांदेड जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने इंधन दर वाढीच्या विरोधात पेट्रोल पंपावर अनोख्या पद्धतीने पेट्रोल भरण्यास आलेल्या वाहन धारकांचे पुष्पगुच्छ देऊन आंदोलन करन्यात आले.
इंधन दरवाढीच्या विरोधात अर्धापूरात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागं घ्या अशा घोषणा देत बाबापेट्रोलपंप दाभड नांदेड – नागपूर रोड येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
नांदेड राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाताखाली आंदोलन झाले.केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे.ती मागे घ्या अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
यावेळी पदवीधर संघाचे जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख, तालुका अध्यक्ष चंद्रकांत टेकाळे,ता.अ.कैलास कपाटे,शहर अध्यक्ष शेख साबेर,रा.वि.काँ.जिल्हा उपाध्यक्ष अमोल कपाटे,वि.काँ.ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख,विनायक दवे,प्रवीण देशमुख,अनिकेत कल्याणकर,पुंडलिक कपाटे,संदीप राऊत,गोविंद कपाटे,शिवा कपाटे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.