राष्ट्रवादीन म्हसळ्यात बाजी मारली !!…

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)

म्हसळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस ने आपले वर्चस्व राखले आहे. तालुक्यातील केल्टे, पाभरे,लिपाणीवावे तर केल्टे बिनविरोध झाली.

लिपणीवावे व पाभरे या ठिकाणी मतदान झाले नऊ संख्या असलेल्या लिपाणीवावे ग्रामपंच्यात मधील सहा सदस्य हे राष्ट्रवादी कांग्रेस चे बिनविरोध निवडून आले होते तर तीन सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रभाग दोन मध्ये कांग्रेस चा पराभव करीत राष्ट्रवादीच्या शमिमा हाशिम कडू, रसिक नामदेव वागरे, शहनाझ महंमद सईद कारभारी हे तीनही उमेदवार निवडून आले.

राष्ट्रवादीने या ग्रामपंचायत मध्ये सर्व जागेवर विजय मिळवला.तर अकरा सदस्य असलेल्या पाभरे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कांग्रेसचे नऊ सदस्य बनविरोध झाले. तर उर्वरीत दोन जागेवर निवडणुका झाल्या.

भाजपचा पराभव करत राष्ट्रवादी चे जागृती जयेश बेटकर, आणि रमेश चंद्रकांत मोरे हे उमेदवार निवडून आले.
सर्व विजयी उमेदवारांचे खा.सुनील तटकरे, ना.अदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, रा.काॅ.प्रदेश सरचिटणीस कौचाली जि.प.सदस्य बबन मनवे, सभापती उज्वला सावंत उपसभापती गायकर आणि पंचायत समिती सदस्य यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या