राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या तालुका उपाध्यक्ष पदी नागेश इबितवार यांची निवड!
–प्रतिनिधी- वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील बडुर येथिल युवा कार्यकर्ता नागेश इबितवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे मराठवाडा मुख्य संघटीका सौ. गोविंदकौर पञे यांच्या हास्ते नियुक्ती पञे देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे राज्य सचिव संघटक बाबुराव गंजगावकर जिल्हा उपाध्यक्ष महमद तनवीर रहीम शेख कंधार तालुका उपाध्यक्ष वैभव घाटे बिलोली तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती या निवडीचे राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी कडुन अभिनंदन करण्यात येत आहे.