राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदी आरळीकर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने नांदेड येथे नुकतेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पद नियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात बिलोली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी निळकंठ पाटील दुधलें आरळीकर याची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तालुका सचिव गणेश पाटील नरवाडे,सहसचिव पदी शिवाजी पंदिलवाड,याची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी पक्ष निरीक्षक आशाताई भिसे, युवक पक्ष निरीक्षक निशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, युवक प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, कार्यध्यक्ष संभाजी पाटील मुकनर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे, कुंडलवाडी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या