विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पुढाकार घेईल – योगेश मेंंदाड़कर

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अगंद कांबळे ]
विद्यार्थी जीवन व्यक्तिमत्व घडवणारे असते व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नेतृत्व व् कर्तुत्व निर्माण होते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व नेतृत्वाला साजल असे घडवावे असे प्रतिपादन म्हसळा शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष शाहनवाज उकये यांनी केले.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे योगेश मेंदाडकर उपस्थित होते. कर्जत येथे पालक मंत्री कु.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते शाहनवाज उकये आणि योगेश मेंदाडकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले 4 आक्टो. रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने अंजुमन हायस्कूल, आयडियल हायस्कूल, शाहीन उर्दू प्राथमिक शाळा, आणि न्यू इंग्लिश स्कुल व् कनिष्ठ महाविद्यालया मध्ये विद्यार्थ्यांचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. योगेश मेंदाडकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पुढाकार घेईल असे म्हणाले.
न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी स्वागत समारंभ आयोजित केला. या कार्यक्रर्माचे प्रास्ताविक प्रा.महंंमद शेख यांनी केले या कार्यक्रमास प्रा.सौ.कल्पना देवगावकर, प्रा.निलेश धुमाळ, संतोष जंगम, यासिर इनामदार, अफीफ घरटकर, फैयाज उकये, सोहेल पाण्डे मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या