शिक्षक नेते उत्तमराव बागल यांच्यातर्फे नीट परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा काकांडी येथे सत्कार!
नांदेड़ – जिल्हा प्रतिनिधी
नीट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार काकांडी येथे शिक्षक नेते ऊत्तमराव बागल यांनी केला.
काकांडी या लहान गावतील रोहित काळेश्वर बागल याने नीट परिक्षेत ६०४ गूण घेतले तर ओंकार रावसाहेब बागल याने ५३७ गुण संपादन करून यश मिळवले.
तर आदिनाथ भगवान बागल यांची MBBS साठी रशिया या देशात निवड झाली आहे.
यानिमित्ताने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
यावेळी तंटामूक्ति समिती अध्यक्ष दशरथ बागल,उत्तम बागल,शिवाजी बागल,किरण स्वामी,प्रकाश बागल हे उपस्थीत होते.