न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश !

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे)

श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत श्रावणी शिवानंद सदलगे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

नेहरु युवक सप्ताह निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत धनाली तुकाराम वतारे,रुचिता रमेश जंगम आणि कीर्ती संतोष डाऊल या विद्यार्थिनीने अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले वक्तृत्व स्पर्धेत अपूर्वा प्रमोद खोत श्रुती शिगवण, धनश्री मेंदाडकर या विदयार्थिनीने प्रथम क्रमांकाचे तीनही पारितोषके पटकावले तर चित्रकला स्पर्धेत शुभम गजानन चिपोळकर शुभम प्रभाकर केंकरे, भाविका उदय गाणेकर यांनी बाजी मारली.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने म्हसळा तहसील कार्यालयाने निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेत विधी पाखड,धनाली वतारे,पाखड सुहास,आंबेकर ख़ुशी,खोत अपूर्वा, श्रुती शिगवण,केंकरे शुभम,गाणेकर भाविक,चव्हाण सुहानी यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अलिबाग यांच्या वतीने जिल्हास्तरीय ऑनलाईन वाद विवाद स्पर्धे मध्ये खारविल श्रुती हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संजय बंडगर,प्रा.सौ कल्पना शेटे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्कुल कमिटीचे चेरमअन समीर बनकर, प्राचार्य प्रभाकर मोरे, प्रा.महंमद शेख,मंगेश कदम, शिक्षक,शिक्षकेतरकर्मचारी,पालक,ग्रामस्थ विद्यार्थी, यांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या