न्यू इंग्लिश स्कुल कनिष्ठ महाविद्यालय म्हसळा येथे, शिक्षक-विद्यार्थी-पालक सहविचार सभा संपन्न !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)

शिक्षण प्रक्रियेत शिक्षक -विद्यार्थी -आणि पालक यांच्यामध्ये समन्व्य असणे गरजेचे आहे. शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करीत असताना विद्यार्थी हित आणि विद्यालयाचे वाटचाल याचा विचार करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कुल कनिष्ठ महाविद्यालयाचे चेरमअन समीर बनकर यांनी केले.

न्यू इंग्लिश स्कुल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार आयोजन केले त्या प्रसंगी समीर बनकर बोलत होते.प्राचार्य प्रभाकर मोरे आणि मान्यवर पालक यांची उपस्थिती होती.
समीर बनकर पुढे म्हणाले कि,कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण झाल्या विद्यार्थी विद्यालयापासून आणि शिक्षणापासून दुरावत चालला असताना विद्यालयाने विविध शैक्षणिकउपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली स्थानिक प्रशासन आणि पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन शाळेच्या गुणवत्तेची दखल घेतली.

प्राचार्य श्री प्रभाकर मोरे सर म्हणाले,पालकांची उल्लेखनीय उपस्तीथी समाधानकारक आहे. विद्यालयात शिक्षणा बरोबरच अनेक शै क्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थयांचे व्यक्तिमत्वाची सर्वांगीण जडणघडण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रास्ताविक प्रा.महंमद शेख यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन पालकांच्या सूचनांचे स्वागत केले या प्रसंगी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा.कुमारी कुताडे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा सौ कल्पना शेटे यांनी केले तर आभार चक्रधर चव्हाण याने मांडले पालक विद्यार्थी शिक्षक मोठया संखेने उपस्थित होते.

ताज्या बातम्या