न्यू इंग्लिश स्कुल नेवरुळ विदयालयात सॅनिटायझर वाटप !

( रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-अंगद कांबळे )

न्यू इंग्लिश स्कुल नेवरुळ विदयालयात सॅनिटायझर घूम गावचे सुपुत्र तथा समाजसेवक श्री सुहास महगावकर यांच्या कडून विदयालयात मास्क व पाच लिटर सॅनिटायझर,थर्मल गन आणि आक्सिमीटर या कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्यात आले.

गेली कित्येक दिवस शाळेपासून दुरावलले इयत्ता पाचवी ते आठवी चे विदयार्थी 27 जानेवारी पासून शाळेत येऊ लागले.त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या कोरोना प्रतिबंध वस्तूचे वाटप करण्याचे योजीले.

समाज सेवक सुहास महगावकर यांनी या वस्तूचे वाटप विद्यालयात करण्याचे नियोजन केले.सुहास महगावकर हे पुणे येथे 39 वर्ष इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले आहेत.सध्या विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आहेत.वृक्षारोपण,आर्सेनिक अल्बम गोळीचे वाटप,शैक्षणिक साहित्य वाटप करणे.
या कार्यक्रमासाठी विद्यालया चे सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र लाड,सरपंच सौ.आर्या महागावकर, उपसरपंच सुनील दिवेकर,ग्रामपंच्यात सदस्य रुक्मिणी लाड, पोलीस पाटील निलेश लटके,दत्ता लटके,शंकर कासार,भरत बेटकर,संजय खताते, पवार व कार्लेकर, प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शाळेच्या मुख्याधिपिका सौ खेळगे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदलगे यांनी केले तर सूत्र संचलन जाधव सर व आभार हिरवे सर यांनी केले. 

ताज्या बातम्या