पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या रोह्याच्या न्हावे – सोनखार गावाला शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे 1 कोटी 16 लाखांची योजना मंजूर ; आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ !

[ अलिबाग प्रतिनिधी : अभिप्राव पाटील ]
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या रोह्याच्या न्हावे – सोनखारमध्ये लवकरच गंगा अवतरणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे या गावासाठी १ कोटी १६ लाखांची योजना मंजूर झाली असून आमदार श्री.महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
जलजीवन योजनेंतर्गत तालुक्यातील न्हावे – सोनखार येथे १ कोटी १६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या गावांमध्ये २४ तास पाणी उपलब्ध व्हावे याकरिता शिवसेनेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ही योजना राबवण्यात येणार आहे. यावेळी मुरुड पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत मोहिते, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत न्हावे मनोज भायतांडेल, शिवसेना शाखाप्रमुख विनायक कटोरे, कमलाकर डबीर, माजी उपसरपंच गैनीनाथ कटोरे आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या